अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असलेल्या दीड हजारांहून अधिक रुग्णवाहिका राज्य शासन खरेदी करणार
मुंबई दि.२४ :- राज्य शासनाकडून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सुविधांनी सुसज्ज असलेल्या १ हजार ७८६ रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत. आधुनिक जीवन रक्षक रुग्णवाहिकेसह कोकण किनारपट्टीसाठी प्रथमच बोट रुग्णवाहिकांचा यात समावेश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास नुकतीच मान्यता देण्यात आली. २५५ जीवन रक्षक, प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे बालरोगतज्ज्ञ आणि काचेच्या पेटीसह (इनक्युबेटर) ३६ नवजात अर्भक रुग्णवाहिका, सागर किनारपट्टी भागासाठी २५ बोट रुग्णवाहिका, आदिवासी दुर्गम भागासाठी १९६ दुचाकी रुग्णवाहिकांचा समावेश आहे.
आयकर विभागाने युवकांमध्ये कर साक्षरता निर्माण करावी – राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन
सध्या नंदूरबार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या बोट रुग्णवाहिकेचा विस्तार आता कोकणातही करण्यात येणार आहे. अलिबाग ते मुंबई हे अंतर रस्तामार्गे पार करण्यासाठी रुग्णवाहिकांना तीन ते चार तास लागतात. तर बोट रुग्णवाहिका हे अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार करू शकतील. अमरावती, गडचिरोली, पालघर, मुंबई, सोलापूर जिल्ह्यात ३० दुचाकी रुग्णवाहिका सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहेत. आता त्याचा विस्तार चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगांव, अहमदनगर आदी आदिवासी जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात करण्यात येणार आहे.
पुराचे पाणी घरात घुसुन झालेल्या नुकसानीसाठी आता प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत
अपघात, दुर्घटना किंवा गंभीर आजारी व्यक्तीला तातडीने प्रथमोपचार मिळावेत तसेच पुढील उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करता यावे यासाठी राज्य सरकारने २०१४ मध्ये राज्यात मोफत रुग्णवाहिका योजना सुरू केली. राज्याच्या कोणत्याही भागातून केवळ १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून मोफत रुग्णवाहिकेची सुविधा मिळविता येते. गेल्या दहा वर्षांत या योजनेंतर्गत ९३७ रुग्णवाहिकांचा ८८ लाखांहून अधिक रुग्णांना उपयोग झाला आहे.
