ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन
ठाणे दि.२४ :- ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा कौस्तुभ, कन्या सुषमा, सुपर्णा असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ठाण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. नटवर्य मामा पेंडसे यांचे ते जावई होते. सावरकर यांच्या कारकिर्दीची सुरुवातीची बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून झाली. त्यावेळी ते नोकरीही करत होते. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केले. हौशी नाट्य संस्थांमधूनही त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ नाटकात मास्टर दत्तारामयांच्यासह जयंत सावरकर यांना काम कऱण्याची संधी मिळाली.
अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असलेल्या दीड हजारांहून अधिक रुग्णवाहिका राज्य शासन खरेदी करणार
जयंत सावरकर यांनी अनंत दामले, केशवराव दाते, जयराम शिलेदार, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत, राजा परांजपे, सुरेश हळदणकर यांच्यासह अद्वैत दादरकर, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, समीर विद्वांस या आणि अशा अनेक जुन्या नव्या पिढीतील दिग्दर्शकांबरोबर काम केले. तीसहून अधिक हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या होत्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही सावरकर यांनी भुषविले होते.
आयकर विभागाने युवकांमध्ये कर साक्षरता निर्माण करावी – राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन
अपराध मीच केला, अपूर्णांक, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला, लग्नाची बेडी, व्यक्ती आणि वल्ली, सूर्यास्त, सूर्याची पिल्ले, लहानपण देगा देवा, तुझे आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा ही त्यांची गाजलेली नाटके. समांतर या मराठी वेबसिरीजमध्ये त्यांची भूमिका होती. पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकातील त्यांनी साकारलेली ‘अंतू बर्वा’ ही व्यक्तिरेखा गाजली. १०० हून अधिक नाटकांमध्ये तसेच मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. सध्या सुरू असलेल्या ‘ आई कुठे काय करते’ या मालिकेत त्यांनी ‘तात्या मामा’ ही भूमिका केली होती.
