ठळक बातम्या

पुराचे पाणी घरात घुसुन झालेल्या नुकसानीसाठी आता प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधीमंडळात घोषणा

मुंबई दि.२४ :- पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या मदतीत यंदा वाढ करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना आता पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आणि विधान परिषेदतही केली. राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात निवेदन केले.

भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या पुणे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

राज्य आपत्ती प्रतिसाद मदतनिधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी, अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांना नुकसानीपोटी गेल्यावर्षाप्रमाणे मदत दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले. उद्या (२५ जुलै ) राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

गेल्यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, गोगलगायींचा प्रादुर्भाव, सततचा पाऊस यामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईकरता ८ हजार ६७७ कोटी तर यंदा मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवेळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी ५१३ कोटींचा निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिमसह अनेक जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. पुरामूळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना प्रशासनाला करण्यात आली असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *