तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नोंदींमध्ये पूर्वी नमूद केलेले नाव,लिंग बदलण्याची परवानगी

मुंबई दि.२७ :- नव्याने प्रवेश घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांना त्यांचे लिंग नोंदविण्याची परवानगी देण्याबरोबरच आता सध्या शिकत असलेल्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक नोंदींमध्ये पूर्वी नमूद केलेले नाव आणि लिंग बदलण्याची परवानगी देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.

‘सीआयएसएफ’च्या सुरक्षा व्यवस्थेविरोधात १ मेपासून शिर्डीत बेमुदत बंदची हाक

स्त्री किंवा पुरुष म्हणून स्वत्वाची जाणीव, भावनांची ओळख होण्यास वेळ लागतो, असेही न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना नमूद केले. टाटा समाजविज्ञान संस्थेच्या (टीआयएसएस) माजी विद्यार्थ्यांने शिक्षण नोंदींमध्ये त्याचे नाव आणि लिंग बदलण्याच्या मागणीसाठी याचिका केली होती. त्यावर निकाल देताना न्यायालयाने हे आदेश दिले.

अंबरनाथ येथील ‘आपला दवाखाना’ १ मेपासून सुरू होणार

याचिकाकर्त्यांने २०१३ मध्ये, संस्थेतून मुलगी म्हणून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले होते. २०१५ मध्ये याचिकाकर्तीने दुसरे नाव धारण केले. तसेच स्वत:ची ओळख तृतीयपंथी सांगितली होती. याचिकाकर्तीला आता कायद्याचे शिक्षण घ्यायचे असून आपले नवीन नाव आणि बदलेल्या लिंगासह नव्याने शैक्षणिक नोंदी उपलब्ध करण्याचे आदेश संस्थेला देण्याची मागणी केली होती. परंतु संस्थेकडून प्रतिसाद न मिळाल्याने याचिकाकर्त्यांने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.