भिवंडी येथे उद्या भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक
मुंबई, दि. १२
आगामी लोकसभा निवडणूक तयारीसाठी भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक आणि प्रशिक्षण वर्ग उद्या भिवंडी येथे आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे राज्य प्रभारी सी.टी. रवी, सहसरचिटणीस शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी साठी ‘रिड इंडिया’ उपक्रम- दीपक केसरकर
भाजपचे केंद्रीय पदाधिकारी, राज्यातील सर्व आमदार-खासदार, लोकसभा व विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूकप्रमुख, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, प्रदेश सुकाणू समिती सदस्य आदी पदाधिकारी या प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहणार आहेत.
—-
