गुणवत्ता वाढीसाठी विशेष कृती आराखडा – यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी
मुंबई दि.२६ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण, दर्जदार आणि उपयोगी ठरेल, असे शिक्षण देण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच दिनांक १५ जून २०२३ पासून या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, पायाभूत साक्षरता व गणितीय संकल्पना इयत्तेनुसार अध्ययन निष्पत्ती आदी विषयांवर विचारमंथन करण्यासाठी उप शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्र संघातर्फे बँकॉक येथे बुद्ध पौर्णिमा महोत्सव
या समिती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला वरील विषयांतील समस्यांवर मात करण्यासाठी ३१ मे पर्यंत अहवाल सादर करणार आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभागाद्वारे माटुंगा येथील एस.आय.ई.एस. शाळा सभागृहात ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ कार्यक्रम अंतर्गत चर्चासत्र पार पडले.
पश्चिम रेल्वेवरील चौथे टर्मिनस जोगेश्वरी येथे – टर्मिनस उभारणीत १३ कंत्राटदारांचा सहभाग
शिक्षकांनी, मुख्याध्यापक, अधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या शिक्षण पद्धती, बिगर शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींनी मुलांना शिक्षणात प्रवाहात आणण्यासाठी हाती घेतलेले निरनिराळे उपक्रम आणि लातूर पॅटर्न या त्रिसूत्रीच्या आधारावर ‘मिशन मेरिट’ राबविण्यात येणार आहे. या तीनही क्षेत्रातील जाणकारांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून पुढील वर्षभराचे नियोजन केले आहे.