सामाजिक

डोंबिवलीत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा – अवयवदान जनजागृतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने लोकवर्गणीतून आयोजित केलेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आज शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता सुनील नगर, डोंबिवली (पूर्व) येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने होळी पौर्णिमेनिमित्त धुळीवंदन कार्यक्रम उत्साहात संपन्न

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यामध्ये सौ. सानिका गंधे, सौ. माधुरी कोरडे तसेच ओमकार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुमार आयुष तावडे आणि रॉयल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुमार मयंक शिगवण यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमास जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष माननीय श्री. मिलिंद बिराडे, अवयवदान जनजागृती करणारे जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री. विजयसिंह परदेशी, श्री. रमेश येवले, माजी अध्यक्षा सौ. विनिता जोशी, डॉक्टर रमेश येवले, श्री प्रशांत प्रधान, सौ. साक्षी शास्त्रकार, तसेच नगरसेवक श्री. मंदार टावरे, नगरसेविका सौ. अलकाताई म्हात्रे व माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

बहिणाबाईंच्या कवितांनी आणि घोषणांनी दुमदुमले उद्यान – कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या स्मृतिदिनाला डोंबिवलीत मोठी उपस्थिती

यावेळी मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत अवयवदानासारख्या पवित्र कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच असा सामाजिक उपक्रम आयोजित केल्याबद्दल व्यायाम समितीच्या कार्याचे कौतुक करून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीच्या वतीने गेल्या ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती समिती सदस्य श्री. विकास जोशी यांनी दिली. तर महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व याविषयी माननीय श्री. कृष्णा सोमार्डे यांनी प्रभावी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कार्यालयाचे प्रतिनिधी श्री. प्रकाश शांताराम माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. सानिका गंधे व सौ. माधुरी कोरडे यांनी केले.

उद्यानाच्या स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान समारंभ

या उपक्रमात अवयवदान जनजागृतीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री. अजित दामले, श्री. गणेश ठोंबरे, सौ. मेघा ठोंबरे आणि पलावा सिटी येथील श्रीमती वैशाली हिरे यांनी स्वेच्छेने अवयवदान नोंदणी अर्ज भरून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणांनी उद्यानाचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

सदर कार्यक्रमासाठी सुमारे १२५ ते १३० नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे विकास जोशी, कृष्णा सोमाडे, प्रदीप पवार, शशिकांत होनमोडे, हेमंत बारस्कर, फुलचंद माली, शरद जोशी, पूजा सुपल, गीता निवळकर, श्वेता शर्मा, प्रतीक्षा माने, रामकृष्ण नारखेडे, रेखा नारखेडे, रेखा जोशी, सचिन वीरनोडकर, प्रमोद तांबूसकर, नेहा तांबूसकर, संगम भुजबळ, पूजाताई सुपल, देविदास चावडा, मदन यवगल, अशोक अमृतकर, राहुल नागले, निशा नागले, विलास सावंत, जयराज पुत्रन, गणेश ठोंबरे, राजू घोलप, विकास म्हात्रे, अशोक जंगले, माधव थिटे, घनश्याम माळवी, बाबू वारके अनंत दत्तू पाटील, लता अनंत पाटील, सुनीती पाचोरकर, सुहास मालंडकर, अरुण कोणार, शशिकांत पारकर, प्रभाकर देशमुख, अश्विनी देशमुख, रमेश दळवी, तुषार सावंत, भूषण नेमाडे, सम्राट पाटील, शशिकांत हुनमोडे, दिनेश वाघुळदे, सार्थक चव्हाण, गिरीश कुलकर्णी, प्रसाद सावंत, दीपक सावंत, प्रवीण थोरात, गिरीश शुक्ल, सुरेश लटकर, स्नेहा भोसले, रेखा कुंदर, केशव देशपांडे, घनःश्याम सोनी, चंद्रकांत पिंगुळकर, केशव कलेश्वर, पी के गाढवे, नरेश भावसार, तपेश्वर मौर्य, विद्या सिनकर, आदी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.