राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रक्त शुद्धीकरणासह मोठ्या शस्त्रक्रिया होणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. १३
राज्यातील सर्व जिल्ह्यांत अद्ययावत आरोग्यसेवा पुरविण्यात येणार असून रक्त शुद्धीकरणाबरोबरच मोठय़ा शस्त्रक्रिया करण्याची सुविधा सर्व शासकीय रुग्णालयांत सुरू करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले.
कूपर रुग्णालयात एन्डोस्कोपी सेवा सुरू
सेंट जॉर्जेस रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेले मॉडय़ुलर शस्त्रक्रियागृह आणि रक्तशुद्धीकरण केंद्राचे उदघाटन महाजन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये मूत्रिपड निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे.
महिला बचत गटांसाठी विक्री केंद्र सुरू करण्याची पालकमंत्री दिपक केसरकर यांची सूचना
खासगी रुग्णालयांमधील अशा आजारांसाठीची सुविधा गरीब रुग्णांना परवडणारी नसल्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयात रक्त शुध्दीकरण केंद्र (मेन्टेनस हिमोडायलिसिस) सुरू करण्यात आले असल्याचे महाजन यांनी सांगितले.
बाणगंगा परिसराचा विकास आणि सुशोभिकरण होणार
राज्यातील या पहिल्या रक्त शुध्दीकरण केंद्रात १० यंत्रे असून ही सुविधा तीन सत्रांत सुरू राहणार आहे. दिवसभरात ३० रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
महापालिकेतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आणखी तीन सीबीएसई शाळा सुरू
येथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळणार असून या योजनेमध्ये समावेश नसलेल्या रुग्णांवर शासकीय दरानुसार २२५ रुपये दरात सेवा पुरविण्यात येईल, अशी माहितीही महाजन यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
——-
