कूपर रुग्णालयात एन्डोस्कोपी सेवा सुरू
मुंबई दि.२८ :- पश्चिम उपनगरातील बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय येथे एन्डोस्कोपी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे अत्याधुनिक पद्धतीने पोटविकारांचे निदान करणे शक्य होणार आहे.
भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेतर्फे ‘करिअर मार्गदर्शन’ विषयावर गिरीश टिळक यांचे व्याख्यान
या एन्डोस्कोपी सेवेचे उदघाटन शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि प्रख्यात एन्डोस्कोपिस्ट डॉ. मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा रविवारी शंभरावा भाग
यावेळी डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेष मोहिते, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नीलम रेडकर आणि शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. स्मृती घेटला उपस्थित होते. ‘एन्डोस्कोपी कशी करावी’ या विषयावर डॉ. मोहन जोशी यांचे व्याख्यान झाले.