कचरा संकलन केंद्रांवर तीन हजार किलो कचरा जमा
कल्याण, दि. १३
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १० प्रभागांमधील कचरा संकलन केंद्रावर मे ते जून या कालावधीत विविध प्रकारचा टाकाऊ पण पुनर्वापर करता येईल असा तीन हजार किलो कचरा जमा केला. यात सुमारे दोन हजार वस्तूंचा समावेश आहे.
टिळकनगर काँलेज आँफ काँमर्सच्या दोन नव्या अभ्यासक्रमांचे उदघाटन
या कच-यातील ज्या वस्तू वापरता येणार आहेत त्या वस्तू सोलास इंडिया संस्थेतर्फे आदिवासी, दुर्गम भागातील गरजू नागरिकांना देण्यात येणार आहेत.
कल्याणच्या वालधुनीत महिन्याभरापासून विजेचा लपंडाव विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम
कचऱ्याची पूर्ण विल्हेवाट, कचऱ्याचा पुनर्वापर आणि प्रक्रिया करुन कचऱ्याची विल्हेवाट अशा तीन स्तरावर या कचऱ्याचे संकलन महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे करण्यात आले.
१० प्रभाग हद्दीतील कचरा संकलन केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे डोंबिवलीत दोन कचरा संकलन केंद्रे कायमस्वरुपी सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी घेतला आहे.
——-
