महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिना, निखत यांना सुवर्णपदक

वृत्तसंस्था

भोपाळ दि.२७ :- भोपाळ येथे सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि निखत झरीन यांनी सुवर्णपद मिळविले आहे. अंतिम फेरीच्या लढतीत ७५ किलो वजनी गटात लवलिना बोर्गोहाईन हिने अरुंधती चौधरीचा ५-० असा तर ५० किलो गटात निखत झरीनने रेल्वेच्या अनामिकाचा ४-१ असा पराभव केला.

मुंबईत स्मार्ट वीज मीटर, बेस्ट प्रशासनाचा निर्णय

हरियाणाच्या मनीषा आणि सविती बुरा, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या साक्षी, मध्य प्रदेशच्या मंजू बांबोरिया यांनीही या स्पर्धेत आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले‌. विजेत्यांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी कडोंमपा प्रयोगशाळा उभारणार

पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण १० पदकांसह रेल्वे संघाने पदकतालिकेत अव्वल स्थान पटकाविले. तर मध्य प्रदेशने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्यांसह दुसरे, आणि हरियाणाने दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांसह तिसरे स्थान पटकाविले.

2 thoughts on “महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिना, निखत यांना सुवर्णपदक

Leave a Reply

Your email address will not be published.