अनिल देशमुख यांची उद्या तुरुंगातून सुटका होणार
जामिनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याची याचिका फेटाळली
मुंबई दि.२७ :- अनिल देशमुख यांच्या जामिनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या ‘सीबीआय’च्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून मंगळवारी फेटाळण्यात आली. त्यामुळे आता देशमुख यांचा तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑर्थर रोड तुरूंगातून उद्या, बुधवारी सुटका होणार असल्याचे सांगितले जाते.
मुंबईत स्मार्ट वीज मीटर, बेस्ट प्रशासनाचा निर्णय
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, ‘सीबीआय’ने केलेल्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला दहा दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे जामीन मिळाल्यानंतरही देशमुख हे तुरूंगातच होते. अखेर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळली.