ठळक बातम्या

इरशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

मुंबई, दि. २०
रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री पवार येत्या २२ जुलै रोजी वाढदिवस आहे.

राज्यभरातील पवार यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढदिवस साजरा करतात. इरशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये.

पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इरशाळवाडी गावाची पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *