एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार जीएसटी कायद्यात संबंधीत दुरुस्ती – महाराष्ट्र वस्तू, सेवाकर (सुधारणा) विधेयक मंजूर
मुंबई, दि. २०
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करणारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक २०२३ आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.
‘एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार हे विधेयक मांडण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सदर विधेयकामध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मधील २२ कलमे व १ अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये प्रामुख्याने न्यायाधिकरण, डेटा अर्कायव्हल पॉलिसी, गुन्ह्यांच्या तरतुदीचे सुलभीकरण, इनपुट टॅक्स क्रेडिट, नोंदणी व परतावा आदी विषयांच्या कलमांमध्ये सुधारणा प्रस्तावित आहे.
—-