उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘दिल, दोस्ती’?
विधानभवन आवारात हसतखेळत गप्पा
राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
मुंबई दि.२३ :- उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यातील राजकीय हेवेदावे आणि कडवटपणा बाजूला ठेवून एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारल्या. हे आश्चर्यकारक चित्र आज विधानभवनात पाहायला मिळाले.
‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिकेत प्राजक्ता माळीचा प्रवेश
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी ठाकरे आणि फडणवीस हे दोघेही विधानभवनाच्या आवारात एकत्र पाहायला मिळाले. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होते आणि दोघांनीही एकमेकांशी छान गप्पाही मारल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोंबिवलीतील ‘मनसे’ कार्यालयाला भेट
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांना स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद मिळविले होते. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांच्यात प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि फडणवीस यांच्या हसतखेळत झालेल्या गप्पा अनेकांसाठी धक्का होत्या.
