Friday, July 10, 2026
Latest:
राजकीय

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती संजय राऊत यांची हकालपट्टी

मुंबई दि.२३ :- शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘दिल, दोस्ती’?

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय अलिकडेच निवडणूक आयोगाने दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी संसदीय नेतेपदावरून संजय राऊत यांना हटवून हा बदल केला.

‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिकेत प्राजक्ता माळीचा प्रवेश

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शिवसेना कार्यकारणीच्या बैठकीत शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून राऊत यांना हटवून किर्तीकर यांची निवड करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *