पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे दि.१७ :- अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार, पंतप्रधान कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात तसेच या योजनांमधील कामांना गती द्यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
‘जय जय स्वामी समर्थ मालिके’त स्वामीसुत पर्वाची सुरुवात – विकास पाटील साकारणार स्वामीसुत
जलयुक्त शिवार- २, पंतप्रधान कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण, वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी ठाणे येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. धरणे, नदी, नाले आदी पाणी साठविण्याच्या ठिकाणी असलेला गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे तातडीने सुरू करावीत. पाणी साठवणुकीची क्षमता वाढ होणाऱ्या जागांची निवड स्थानिक लोकप्रतिनिधींचा माध्यमातून करावी.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दुर्गाबाई भागवत यांच्यावरील लघुपटाचे सादरीकरण आणि व्याख्यान
तसेच जलयुक्त शिवार टप्पा दोनची कामेही तातडीने सुरू करावीत. हे अभियान लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रशासनाबरोबरच जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या नाम फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, वसुंधरा संस्था आदींसारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पावसाची कमी सरासरी व निसर्गाचा लहरीपणा पाहता जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण या योजनांच्या कामांना प्राधान्य द्यावे. गावांनी आराखडा तयार करून कामे सुरू करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी व त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा.
मुंबई विमानतळावर २.२३ कोटी रुपये किंमतीचे ३५३५ ग्रॅम सोने जप्त
या कामांची पाहणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपण स्वतः करणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्त शिवार लोकसहभागातून यशस्वी करा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. देसाई मंत्रालयातून सहभागी झाले होते. आमदार महेश शिंदे, आमदार प्रकाश आबिटकर, ज्ञानराज चौघुले, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, मृद व जलसंधारण आयुक्त मधुकर अरदड हे ही दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.