‘जय जय स्वामी समर्थ मालिके’त स्वामीसुत पर्वाची सुरुवात – विकास पाटील साकारणार स्वामीसुत
मुंबई दि.१७ :- कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत आता नवी गोष्ट सुरु होणार आहे. मालिकेत स्वामीसुत पर्वाची सुरुवात होणार असून अभिनेते विकास पाटील ‘स्वामीसुत’ ही भूमिका साकारणार आहेत. स्वामींनी ज्यांना आपले पुत्र मानले ते हरिभाऊ तावडे ऊर्फ स्वामीसुत यांची गोष्ट सुरू होणार आहे. हरिभाऊ तावडे ऊर्फ स्वामीसुत हे महापालिकेत नोकरीला होते. तावडे यांच्या घरी त्यांची आई, पत्नी आणि मुलगी सिद्धा आहेत.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दुर्गाबाई भागवत यांच्यावरील लघुपटाचे सादरीकरण आणि व्याख्यान
कोणतीही गोष्ट टोकाला जाऊन करणे हा त्यांचा स्वभाव आहे. स्वामींनी हरिभाऊंना स्वप्नात विविध रूपात दर्शन देऊन मोठ्या संकटातून वाचवणे असो ? नवस आणि अश्या गोष्टींवर विश्वास नसलेले हरिभाऊ यांचे थेट अक्कलकोटला जाणे असो… हरिभाऊ आणि रामाचार्याची भेट होणे, त्यानंतर चोळप्पा घरी जाण्याचा योग येणे असो हे सर्व मालिकेत पाहायला मिळणार आहे.
मी स्वतः स्वामी भक्त असून मला ही भूमिका करण्याची संधी मिळाली ही भाग्याची गोष्ट आहे, असे विकास पाटील यांनी सांगितले. जय जय स्वामी समर्थ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होते.