मुंबई विमानतळावर २.२३ कोटी रुपये किंमतीचे ३५३५ ग्रॅम सोने जप्त

मुंबई दि.१७ :- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्तचर महसूल संचालनालयाने दोन प्रवाशांकडून तस्करी करून आणलेले २.२३ कोटी रुपये किमतीचे ३५३५ ग्रॅम सोने जप्त केले.‌

चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करण्यात येणार – सुधीर मुनगंटीवार

एमिरेट्स कंपनीच्या ईके-५०० या विमानाने दुबई येथून मुंबई विमानतळावर उतरलेल्या या दोघा संशयित प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचच चौकशी आणि तपासणी केली असता या दोघांकडे काळ्या टेपने बेमालूमपणे गुंडाळलेल्या चार प्लास्टिक पाकिटांमध्ये लगद्याच्या स्वरूपातील लपविलेले सोने आढळून आले.

जनतेला कधीही गृहित धरू नये हा बोध कर्नाटक निवडणूक निकालातून घ्यावा – राज ठाकरे

ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती दुबईबाहेर कार्यरत असणाऱ्या आणि दररोज सोन्याची तस्करी करण्यात सहभागी असलेल्या कुप्रसिद्ध टोळीचे सदस्य आहेत. दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.