औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.१८ :- राज्यातील औषध विक्रेत्यांना सुरळीतपणे व्यवसाय करता यावा, हा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यस्तरावर औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एक समिती स्थापन करावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

गृहनिर्माण प्रकल्पांमधील ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी नोंदणी प्रक्रिया अधिक कडक – महारेराचा निर्णय

राज्यातील औषध विक्रेत्यांच्या समस्यांबाबत ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, बंदर विकास मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी आणि औषध विक्रेत्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नाकावाटे घ्यावयाच्या करोना प्रतिबंधक वर्धक मात्रा लसीला मुंबईकरांचा अल्प प्रतिसाद

औषध विक्रेता हे समाजातील महत्वाचा घटक आहे, त्यांना व्यवसाय करतांना येणाऱ्या जाचक अटी दूर करायला हव्यात. राज्यात कुठे बोगस औषधांची विक्री होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाया कराव्यात. त्याचवेळी इतर औषध विक्रेत्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.