ठळक बातम्या

२०२८ लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील : राजदूत एरिक गारसेटी

मुंबई दि.१७ :- २०२८ मध्ये लॉस एंजलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी यांनी आज येथे दिली. राजदूत पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई भेटीवर आलेल्या राजदूत एरिक गारसेटी यांनी बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

२०३६ साली भारताने देखील मुंबई आणि अहमदाबाद येथे ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत विचार केला पाहिजे असेही गारसेट्टी यांनी सुचविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात टोकियो, ऑस्ट्रेलिया, वॉशिंग्टन व नवी दिल्ली येथे चार बैठकी होणार असून अंतरिक्ष विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, सप्लाय चेन यांसह संरक्षण क्षेत्रात उभय देशांमध्ये सहकार्य वाढविण्याचे दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

नाकावाटे घ्यावयाच्या करोना प्रतिबंधक वर्धक मात्रा लसीला मुंबईकरांचा अल्प प्रतिसाद

अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी महाराष्ट्रात आपल्या शाखा सुरु कराव्या किंवा राज्यातील विद्यापीठांसोबत सहकार्य करावे अशी अपेक्षा राज्यपाल बैस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्राचे राज्यपाल या नात्याने आपण २६ विद्यापीठांचे कुलपती असून अलीकडेच राज्यातील काही विद्यापीठांचे अमेरिकेतील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कशी करार झाल्याची माहिती राज्यपालांनी दिली. बैठकीला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी, राजकीय व आर्थिक विषयक काउंसल क्रिस्तोफर ब्राऊन व राजकीय सल्लागार प्रियांका विसरिया – नायक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *