नाकावाटे घ्यावयाच्या करोना प्रतिबंधक वर्धक मात्रा लसीला मुंबईकरांचा अल्प प्रतिसाद
मुंबई दि.१९ :- नाकावाटे घ्यावयाच्या ‘इन्कोव्हॅक’ लसीला मुंबईकरांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईतील केवळ ८९ जणांनी ही लस घेतली आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २८ एप्रिल २०२३ पासून ६० वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून ‘इन्कोव्हॅक’ लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबईतील अतिधोकादायक २१६ इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करणार – महापालिका आयुक्तांचे आदेश
त्यानुसार ‘कोविशिल्ड’ अथवा ‘कोवॅक्सिन’ची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने झालेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना ‘इन्कोव्हॅक’ लस वर्धक मात्रा म्हणून देण्यास सुरुवात झाली. बृहन्मुंबई महापालिकेच्या २४ करोना लसीकरण केंद्रांवर ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र मागील २० दिवसांमध्ये वर्धक मात्रा घेण्यासाठी खूप कमी प्रतिसाद मिळाला आहे.
