ठळक बातम्या

सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाई करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.३१ :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ संकेतस्थळावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत.

केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदविले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या संकेतस्थळावरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याची सूचना केली.

नवीन कामगार नियमांना मान्यता

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे. त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *