Saturday, July 11, 2026
Latest:
धर्म संस्कृती

“निसर्ग वारी…” पर्यावरण पूरक, समाज जागृतीचा कृतिशील स्तुत्य उपक्रम…! पंधरा वर्षांची अखंड परंपरा

सासवड:

“पर्यावरण रक्षण म्हणजेच स्व-संरक्षण” हा संदेश देत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सासवडमध्ये एक विशेष पर्यावरणपूरक उपक्रम राबवला जात आहे. ‘निसर्गवारी’ अंतर्गत ‘प्लास्टिक थर्मोकोल कचरामुक्ती दिंडी अभियान’ चालवले जात असून, याचाच एक भाग म्हणून रविवार, दिनांक १२ जुलै रोजी सकाळी १०:०० वाजता मोफत पत्रावळ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सासवड येथील पुणे रोडवर असलेल्या धन्वंतरी हॉस्पिटलच्या समोर संपन्न होईल. ‘थं क्रिएटिव्ह’ आणि ‘टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड’ (TJSB Sahakari Bank Ltd.) यांच्या विशेष सहकार्याने हा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पंढरपूर वारी थर्माकॉल-प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प: ‘थं क्रिएटिव्ह’कडून २.५ कोटी पत्रावळ्यांचे वाटप, डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे आर्थिक मदतीचे आवाहन

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्रमुख उपस्थिती सहकार भारतीचे अ.भा. संघटन मंत्री संजयजी पाचपोर, अभाविपचे सह संघटन मंत्री देवदत्तजी जोशी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी चे विश्वस्त ह.भ.प. श्री. भावार्थजी देखणे, विश्व हिंदू परिषदचे अ.भा. सत्संग प्रमुख दादा वेदक, आणि ह्या निसर्गवारीचे संस्थापक प्रशांत अवचट आदि मान्यवर कार्यक्रमाला लाभणार आहेत.

विठू माऊलीच्या ओढीने निघाली ‘साहित्य दिंडी’; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पुस्तक वारी’चा दिमाखदार शुभारंभ!

उपक्रमाचा उद्देश

आषाढी वारीदरम्यान मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि थर्मोकोलच्या ताटांचा वापर केला जातो, ज्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. ही वारी कचरामुक्त आणि नैसर्गिक व्हावी यासाठी भाविकांना आणि नागरिकांना मोफत पत्रावळींचे वाटप केले जाणार आहे. निसर्गवारीच्या या मोहिमेमुळे सासवड आणि परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना आणि वारकऱ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

वारी स्वच्छ, पर्यावरण सुरक्षित! ‘निसर्गवारी’ अभियानाची विठूरायाच्या चरणी १५ वर्षांची अखंड सेवा; कचरामुक्त वारीचा संकल्प