Saturday, August 29, 2026
Latest:
सामाजिक

नागपूर येथे ‘मंथन4युवा’ समारोप सोहळा उत्साहात; तरुण पिढीला नवीन कल्पना व नवोपक्रमांसाठी शासनाचे पूर्ण सहकार्य

नागपूर:

युवा पिढीचा शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा आणि स्टार्टअप्स यासारख्या विविध क्षेत्रांत सकारात्मक सहभाग वाढवण्यासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल, तसेच तरुणांशी चर्चा करून अधिक सक्षम स्टार्टअप इकोसिस्टीम पॉलिसी तयार केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर आयोजित ‘मंथन4युवा’ या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या भव्य कार्यक्रमास २५ हजारांहून अधिक युवक-युवतींची उपस्थिती होती.

या सोहळ्यात महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवत ४,१०- ढोल-ताशा वादकांनी एकत्र येऊन भव्य वादन सादर केले. या ऐतिहासिक वादनाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘इंडिया Book ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद झाली आहे. यासोबतच ५८५ नोंदणीकृत ध्वजधारकांच्या सहभागाने यापूर्वीचा २६० ध्वजधारकांचा जागतिक विक्रम मोडीत काढला. या दोन्ही विश्वविक्रमांबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन केले.

शाळेच्या कँटीनमध्ये वडापावऐवजी इडली, कोलाऐवजी ताक; आरोग्यदायी पर्यायांसाठी एफडीएचा मोठा निर्णय

युवा आयकॉनशी थेट संवाद

सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक रिद्धिमा पाठक यांनी मुख्यमंत्र्यांसह भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा, पॅरा-ॲथलिट दिलीप गावित, ‘जेनेरिक आधार’चे संस्थापक अर्जुन देशपांडे आणि ‘गो झीरो’चे संस्थापक किरण शाह यांच्याशी थेट संवाद साधला. या दिग्गजांनी आपल्या प्रवासातील अनुभव सांगत तरुणांना प्रेरित केले.
संविधान आणि युवा धोरण

आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय संविधानामुळेच लोकशाही प्रगल्भ झाली असून एका सामान्य नगरसेवकापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणे मला शक्य झाले. स्टार्टअप धोरणाविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, तरुणांना १००% मदत देण्याचे शासनाचे धोरण असून आगामी काळात युवकांसोबत अधिक चर्चा करून अधिक प्रभावी धोरण आणले जाईल. तसेच मुलांचा स्क्रीन टाईम कमी करून त्यांना मैदानाकडे वळवण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने धोरण आखले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

उत्तर प्रदेशात विजयाची ‘हॅटट्रिक’ साधण्याचे तावडे यांच्यासमोर मुख्य आव्हान; बिहारमधील यशस्वी रणनीतीचा भाजपला विश्वास

नशामुक्त भारताची शपथ

१ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात आलेल्या या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांचा आणि विविध क्षेत्रांतील युवा आयकॉन्सचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उपस्थितांना ‘नशामुक्त महाराष्ट्र व देश’ घडवण्यासाठी अमली पदार्थमुक्त जीवनशैलीची शपथ दिली.
या कार्यक्रमाला आयोजक विष्णु चांगदे, रितेश गावंडे, विविध क्षेत्रांतील युथ आयकॉन्स आणि हजारो तरुण-तरुणी उपस्थित होते.