आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला दिलेली शिकवण शाश्वत – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
खारघर दि.१६ :- आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला दिलेली शिकवण शाश्वत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज खारघर येथे केले. रविवारी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर झालेल्या समारंभात ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी शाह बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि लाखो अनुयायी यावेळी उपस्थित होते.
मेट्रो ६ ची कारशेडसाठी १५ हेक्टर जागा ‘एमएमआरडीए’ ला हस्तांतरित करण्याचे आदेश
‘ही एवढी मोठी गर्दी मी माझ्या जीवनात कधीही पाहिली नाही. ही गर्दी तुमच्या मनातील आप्पासाहेबांबद्दलचा मान, सन्मान, भक्तीभाव दाखवून देते. अशा प्रकारचा मान, सन्मान, भक्तीभाव फक्त त्याग, सर्मपण आणि सेवेमुळे मिळतो, जे आप्पासाहेबांच्या आतमध्ये आहे. हा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान असल्याचे सांगून शाह म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी कडोंमपा परिवहन सेवेची बससेवा उपलब्ध

पुरस्काराची मिळालेली २५ लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी यावेळी जाहीर केले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजसेवेचे काम सुरू ठेवणार आहे. आशिर्वादावर अवलंबून न राहता प्रत्येकाने काम केले पाहिजे. किर्ती सहसा मिळत नाही. समाजसेवेचे काम हे कधीही पूर्ण होणार नाही. या कार्यासाठी आणखी आयुष्य मिळावे असे वाटते. सतकिर्ती वाढवावी, अपकिर्ती थांबवावी. किर्ती वाढवण्यासाठी मेहनत करावी लागेल, असेही आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.
हेदुटणे गावाजवळ जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया
ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी धर्माधिकारी परिवाराचे मोठे योगदान आहे. उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचे काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगात खरे श्रीमंत तुम्ही आहात. इथे जमलेले लोक जगातील आठवे आश्चर्य आहे. कपडे खराब झाले तर धुता येतात. पण मन स्वच्छ कसे करायचे? आप्पासाहेब हे मन स्वच्छ करण्याचे रसायन आहे.
