ठळक बातम्या

मेट्रो ६ ची कारशेडसाठी १५ हेक्टर जागा ‘एमएमआरडीए’ ला हस्तांतरित करण्याचे आदेश

मुंबई दि.१५ :- स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ च्या कारशेडसाठी कांजूरमध्ये १५ हेक्टर जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू असून, ती २०२५ मध्ये सेवेत दाखल करण्याचे ‘एमएमआरडीए’चे नियोजन आहे.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी कडोंमपा परिवहन सेवेची बससेवा उपलब्ध

‘एमएमआरडीए’ने या मार्गिकेची कारशेड कांजूरमार्गच्या जागेवर प्रस्तावित केली होती. महाविकास आघाडी सरकारने आपल्या काळात मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील कारशेड याच जागेवर हलविण्याचा निर्णय घेतला होता. जागेच्या मालकी हक्कावरून सुरू झालेला वाद न्यायालयात गेला.
मेट्रो ३ ची कारशेड आरेमधून कांजूरला नेण्यास भाजपने विरोध केला.

हेदुटणे गावाजवळ जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर कारशेड कांजूरमधून पुन्हा आरेत हलविली. या वादात मेट्रो कारशेड अडकली. आता मेट्रो ६ चे काम वेगाने होत असल्याने कारशेडचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक होते. त्यानुसार ‘एमएमआरडीए’ने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यास अखेर यश आले आहे. त्यानुसार राज्य सरकारने ही जागा मेट्रो ६ च्या कारशेडसाठी देण्यास संमती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *