‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संध्याकाळी करावे हे प्रशासनाला कळले नाही का? राज ठाकरे यांंचा सरकारला सवाल
मुंबई दि.१७ :- ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संध्याकाळी करावे हे प्रशासनाला कळले नाही का? असा प्रश्न ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून विचारला आहे. उष्माघातामुळे १२ श्रीसेवकांचा मृत्यू झाला तर १५ श्रीसेवकांवर कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी नवी मुंबईत ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भर उन्हात लाखो श्रीसेवक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या सोहळ्याला जे गालबोट लागले ते टाळता आले नसतंशै का ? कधी नव्हे ते मुंबईतही उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत आहेत.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला दिलेली शिकवण शाश्वत – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी, असेही राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान राज ठाकरेंनी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि सध्या उष्माघातावर उपचार घेत असलेल्या श्रीसेवकांची भेट घेतली.
