Thursday, June 18, 2026
Latest:
राजकीय

मुख्यमंत्री फडणवीस यांचा दिल्ली दौरा नेमका उद्येश काय??

विजय राउत 

विधानपरिषदेच्या जागावाटपाचा वाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून अचानक दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील तिन्ही मुख्य नेते दिल्लीत एकाचवेळी असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला.त्यावेळी ते म्हणाले की, “राजकीय बैठकीसाठी मी दिल्लीत आलो नव्हतो. राज्याच्या विकासकामासाठी आलो होतो.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा: अमित शाह यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक; पंतप्रधान मोदींचेही लाभले मार्गदर्शन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आम्ही दोन दिवसांपासून दिल्लीत आहोत, त्याबाबत एवढा प्रश्न का पडला आहे? राज्यातील जनतेसाठी आणि महत्त्वाच्या योजनांसाठी केंद्राकडे भूमिका मांडणे हे आमचे कर्तव्यच आहे. महाराष्ट्रातील कांदा आणि ऊस उत्पादकांचे प्रश्न असोत किंवा जलजीवन मिशनचे प्रलंबित प्रकल्प. राज्याचे प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही केंद्राकडे जाणार नाही तर कोणाकडे जाणार? अशी विचारणा त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, “जनतेच्या हितासाठी केंद्राशी संवाद साधण्यात आम्हाला कोणताही कमीपणा वाटत नाही. अगोदरच्या सरकारला केंद्राशी बोलणे किंवा मदत मागणे कमीपणाचे वाटत असेल, पण आमची तशी भूमिका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रासाठी नेहमीच मदतीचा हात दिला असून राज्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी केंद्राकडून मिळाला आहे.

या दिल्ली दौऱ्यात प्रामुख्याने कांदा उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, ग्रामीण भागातील घराघरांत पाणी पोहोचवणाऱ्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली.

दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले: शिंदे-पवारांना बाजूला करून फडणवीस खेळताहेत का कोणती ‘अदृश्य चाल’?

या सर्व बैठका अत्यंत सकारात्मक झाल्या असून केंद्राकडून या प्रश्नांवर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. केंद्राकडून मिळणारे हजारो कोटी रुपये राज्यासाठी आणायचे असतील, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि तेच प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही त्यांनी सांगितले

विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ” महायुती 17 जागा लढवेल आणि सर्व जागा जिंकेल, असा दावा केला आहे .

विधान परिषद निवडणुकीसाठी 1 जून रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, महायुतीमध्ये अद्याप जागावाटप अधिकृतपणे जाहीर झाले नाही. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, “महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाही.

वास्तविक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपाचे अध्यक्ष यांची भेट घेत चर्चा केली।

तसेच संभाव्य इच्छुक उमेदवारांची यादी देखील त्यांच्याकडे सोपविली आहे .त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा वाटपा बाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले नव्हते ,अशीही चर्चा सुरु आहे .मग फडणवीस दिल्ली दौऱ्याचा नेमका उद्येश काय ? हाच खरा प्रश्न आहे .