हेदुटणे गावाजवळ जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया
डोंबिवली दि.१५ :- बदलापूर जवळील बारवी धरणातून येणारी जलवाहिनी शनिवारी पहाटे काटई-बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरील हेदुटणे गावाजवळ फुटली. जलवाहिनीतील पाण्याच्या अतिदाबामुळे पाण्याचे कारंजे ४० ते ५० फूट उंच उडत होते. यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले.
मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक
व्हॉल्व सैल होऊन त्यावर पाण्याचा दाब वाढल्याने हा प्रकार घडला. बारवी धरणातून ठाणे, कळवा, मुंब्रा, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, डोंबिवली परिसराला दररोज सुमारे ९०० ते अकराशे दशलक्ष लीटर पाणी पुरवठा सोळाशे मिलमीटर व्यासाच्या जलावाहिन्यांमधून केला जातो. या वाहिन्यांच्या सुमारे ५० ते १०० मीटर अंतरावर पाण्याने भरलेल्या जलवाहिन्यांमधील दाब नियंत्रित करण्यासाठी व्हॉल्व आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा हार्बर रेल्वेवरील उद्याचा मेगा ब्लॉक रद्द
पाण्याचा दाब वाढून पाणी अतीवेगाने बाहेर फेकले गेले, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सांगण्यात आले. बारवी धरणाकडून जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान पाण्याचे कारंजे भ्रमणध्वनीमध्ये टिपण्यासाठी वाहन चालक, प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
