लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगांना सुरुवात
दक्षिण मुंबईत ७५० आसनी नवे नाट्यगृह
मुंबई दि.२३ :- बृहन्मुंबई महापालिकेतर्फे दक्षिण मुंबईत नव्यानेच उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात गुढीपाडव्याच्या दिवशी ‘चारचौघी’ या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग पार पडला. हे नाट्यगृह ७५० आसनांचे आहे. भायखळा पूर्व येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाजवळ हे नाट्यगृह उभारण्यात आले आहे.
शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती संजय राऊत यांची हकालपट्टी
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि प्रशांत दळवी लिखित ” या नाटकात रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर कलाकार आहेत. या नाट्य प्रयोगास अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, परिमंडळ एकच्या उपायुक्त डॉ. श्रीमती संगीता हसनाळे आणि नाट्यरसिक उपस्थित होते.
