पुढील तीन दिवसांत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस
मुंबई दि.२३ :- येत्या तीन दिवसांत राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगांना सुरुवात
हवेच्या कमी दाबाचा आस आणि महाराष्ट्राच्या भूभागावर तयार झालेली वारा खंडितता प्रणाली यामुळे येत्या २५ मार्चपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कायम आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारपर्यंत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे,
शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती संजय राऊत यांची हकालपट्टी
धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवार आणि शनिवारी अवकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘दिल, दोस्ती’?
नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे शनिवारी विजांसह पावसाची शक्यता आहे. तोपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे.
जळगाव, अहमदनगर, पुणे येथेही पुढील तीन दिवसांमध्ये अधूनमधून पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
