अनिल जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक
मुंबई दि.२० :- अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अनिल जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. जयसिंघानीला मुंबईत आणण्यात आले असून त्याला मलबार हिल पोलिसांकडेही सुपूर्द करण्यात आले आहे.
ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात स्थानिकांवर गोळीबार
जयसिंघानी बऱ्याच वर्षांपासून फरार होता. मुंबई पोलिसांनी पाच दिवसांची शोध मोहीम राबवून त्याला अटक केली. गुजरात पोलिसांच्या मदतीने जयसिंघानीला गुजरात राज्यातील कलोल येथे अटक करण्यात आली.
घर खरेदी-विक्रीचे व्यवहार करणा-या एजंटांना महारेराचे प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक
जयसिंघानीकडून भ्रमणध्वनी, चारचाकी वाहन, विविध उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. जयसिंघानीवर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये एकूण १५ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून मुंबईत पत्रकार परिषदेत देण्यात आली.
