ठळक बातम्या

संपातील शिक्षकांच्या सहभागामुळे दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपसणीविना

मुंबई दि. २० :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप आंदोलनात राज्यातील माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षक सहभागी झाले आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातल्यामुळे दहावीच्या सुमारे ५० लाख तर बारावीच्या सुमारे ८० लाख उत्तरपत्रिका तपासणीला पडून आहेत.

अनिल जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक

जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.‌ शिक्षकही संपात सहभागी झाले असल्याने या शिक्षकांनी उत्तरपत्रिका स्वीकारणे आणि उत्तरपत्रिका तपासणे हे काम शिक्षकांनी थाबविले आहे.

ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात स्थानिकांवर गोळीबार

या सगळ्याचा फटका दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला असून यामुळे कदाचित निकाल उशिरा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *