ठळक बातम्या

घर खरेदी-विक्रीचे व्यवहार करणा-या एजंटांना महारेराचे प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई दि.२० :- रेरा कायद्यानुसार स्थावर मालमत्ता क्षेत्रातील जुन्या-नव्या मध्यस्थांना महारेराचे प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. एजंटांनी महारेरा नोंदणी केली असेल तरच एजंट म्हणून काम करता येते. अनेक ग्राहक एजंटांच्या माध्यमातूनच घर खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. यातून अनेकदा ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार घडण्याची शक्यता असते.

राज्य सरकारचा निषेध करत विरोधी पक्षांचा सभात्याग

एजंट म्हणून काम करण्यासाठी कोणतेही शिक्षण-प्रशिक्षण नसल्याने कोणीही हा व्यवसाय करतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी महारेराने प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

छेडानगर येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण; मानखुर्द ते ठाणे हा प्रवास अधिक वेगवान

याच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली असून एप्रिल महिन्याच्या अखेरीस आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन) या संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. नवीन नोंदणी तसेच नूतनीकरणासाठी येत्या १ मेपासून प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. मात्र महारेरा नोंदणीधारक जुन्या ३९ हजारांहून अधिक एजंटांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *