Saturday, July 11, 2026
Latest:
राजकीय

नीलम गोऱ्हे आणि राहुल नार्वेकर यांच्यातील मानापमान नाट्याचे विधानसभेत पडसाद

मुंबई दि.१७ :- विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यातील मानापमान नाट्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. आमदार आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी सुरू झाल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यात हस्तक्षेप करत नियमांवर बोट ठेवले.

बसमध्ये विसरलेल्या,गहाळ झालेल्या भ्रमणध्वनीची यादी ‘बेस्ट’कडून जाहीर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ परिसरात संगीत रजनी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाबद्दल उपसभापती नीलम गोऱ्हे यांना माहिती देण्यात आली नव्हती. विधान परिषदेतील आमदारांनी यावर आक्षेप घेतला. तसेच उपसभापतींच्या अधिकारावर गदा आणली जात आहे का, असे सवाल उपस्थित केले.

राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी संपली; पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला

हा मुद्दा शुक्रवारी विधानसभेत उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पीठासिन अधिकाऱ्यांचे नियम, तरतुदी आणि कर्तव्ये वाचून दाखवली. घटनेतील तरतूदींवर बोट ठेवत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी केलेल्या भाष्याला उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *