राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी संपली; पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला
मुंबई दि.१६ :- गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तासंघर्षांवर सुरु असलेली सुनावणी अखेर आज संपली. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने यावरील निर्णय राखून ठेवला आहे.
इन्फल्युएंझा आजाराबद्दल जनजागृती करण्यात यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
शेवटच्या सुनावणीच्या वेळीही न्यायालयाने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या उद्धव ठाकरे यांना पुन्हा कसे बोलावणार? असा सवाल केला. ठाकरे गटाचे वकील मनू सिंघवी यांनी ‘परिस्थिती जैसे थे ठेवा’, अशी विनंती केली.
पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीटीची शक्यता
दरम्यान पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातील न्यायमूर्ती शहा हे १३ मे रोजी निवृत्त होत आहेत, त्यानंतर न्यायालयाला उन्ह्याळ्याची सुटी लागणार आहे. त्यामुळे त्याआधी या प्रकरणी निर्णय येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
