डोंबिवलीत ‘उदयन्तु’ प्रकल्पाचे उद्घाटन, सत्कार व पुस्तक वाटप सोहळा; ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी रोटरीचा पुढाकार
डोंबिवली : ‘पर्वन’ या संकल्पनेला अनुसरून आणि ‘क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट’ (Create Lasting Impact) या ध्येयाने प्रेरित होऊन, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे (Rotary Club of Dombivli East) गेल्या ६ वर्षांपासून ग्रामीण व निमशहरी भागातील मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘उदयन्तु – The rise of bright students’ हा विशेष शैक्षणिक उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षातील भव्य उद्घाटन, सत्कार समारंभ आणि पुस्तक वाटप (Udayantu Inauguration, Felicitation & Books Distribution) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ ऑगस्ट रोजी भव्य सोहळा
हा विशेष कार्यक्रम रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी रोटरी भवन (पेणकर कॉलेजजवळ, डोंबिवली पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे स्वरूप व वेळपत्रक खालीलप्रमाणे असेल:
- सकाळी ८:०० ते १०:३० : चाचणी आणि मुलाखत (Test & Interview)
- सकाळी ११:०० ते दुपारी १:०० : ‘उदयन्तु’ उद्घाटन, सत्कार आणि मोफत पुस्तक वाटप सोहळा (Inauguration & Books Distribution)

प्रमुख वक्त्यांचा विशेष सहभाग
या सोहळ्यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. अनुजा पालसुलेदेसाई (B.A., M.A., Ph.D. – Economics, L.L.B.) लाभणार असून, त्या उपस्थितांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
‘उदयन्तु’ प्रकल्पाचे स्वरूप आणि ध्येय
ग्रामीण व सेमी-इंग्रजी माध्यमातील इयत्ता ७ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांची अभ्यासातील अचूकता, वेग, आत्मविश्वास व सातत्य वाढवणे आणि त्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रकल्पांतर्गत दरवर्षी ऑगस्ट ते फेब्रुवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ७:०० ते ८:३० या वेळेत विद्यार्थ्यांना मोफत व नियमित मार्गदर्शन केले जाते. या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचा परिणाम म्हणून मागील वर्षी या प्रकल्पातील ८ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन; २३ ऑगस्टला रंगणार विशेष मुलाखत
यशस्वी वाटचाल आणि यंदाची टीम
या प्रकल्पाची सुरुवात PP रोटेरियन दिलीप काटेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या प्रवासात IPP संदीप घरत, Immediate Past Secretary विनायक आगटे, रोटेरियन शिल्पा कोठावदे आणि रोटेरियन वर्षा काटेकर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
यंदाच्या वर्षी हा प्रकल्प अध्यक्ष रोटेरियन अथर्व जोशी आणि मानद सचिव रोटेरियन सुबोध पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. तसेच शैक्षणिक नियोजन व अंमलबजावणीसाठी Educational Director रोटेरियन विशाल सारूक आणि Project Chair रोटेरियन जोसेफ गोशी कार्यरत असून, त्यांना रोटेरियन सुनंदा जगताप, रोटेरियन वर्षा काटेकर आणि रोटेरियन शिल्पा कोठावदे यांचे सहकार्य लाभत आहे.
योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही शैक्षणिक व स्पर्धात्मक यशाची शिखरे गाठू शकतात, या विश्वासातून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचा हा उपक्रम पुढेही सातत्याने सुरू राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

