हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन; २३ ऑगस्टला रंगणार विशेष मुलाखत
ठाणे:
गृह मंत्रालयाचे माजी केंद्रीय अवर सचिव पद्मश्री आर.व्ही.एस. मणी यांच्या मूळ पुस्तकावर आधारित आणि पत्रकार-लेखक अरूण करमरकर यांनी अनुवादित केलेल्या ‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ (2nd Reprint Edition) या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्ताने एक विशेष मुलाखत सत्र देखील रंगणार असून, यामध्ये माजी खासदार तथा एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे हे पद्मश्री आर.व्ही.एस. मणी यांची विशेष मुलाखत घेणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचा कौतुकास्पद उपक्रम; क्षयरुग्णांना मिळणार पोषणाचा आधार!
कार्याचा तपशील:
दिनांक: रविवार, २३ ऑगस्ट २०२६
वेळ: सायंकाळी ५.३० वाजता
स्थान: समारोह, सीकेपी हॉल, खारकर आळी, एनकेटी कॉलेज शेजारी, ठाणे (पश्चिम)
या कार्यक्रमाचे आयोजन दीनदयाळ प्रेरणा केंद्र (ठाणे), घंटाळी विष्णूनगर हिंदू संमेलन समिती, परममित्र पब्लिकेशन्स तसेच नौपाडा, पाचपाखाडी, चरई, खारकर आळी, स्टेशन रोड, खोपट आणि वृंदावन-श्रीरंग सोसायटी परिसर संमेलन समितीच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे. या जाहीर कार्यक्रमास नागरिकांनी सहकुटुंब व मित्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

