गजानन महाराज विदर्भीय सामाजिक संस्था आयोजित स्नेहसंमेलन व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
सचिन शिंदे
कल्याण (पूर्व), २५ जुलै २०२५ – श्री गजानन महाराज विदर्भीय सामाजिक संस्थेच्या वतीने भाविक आणि समाजबांधवांसाठी एक विशेष स्नेहसंमेलन तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम येत्या रविवारी, २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये म्हणजे महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच सर्वांसाठी स्नेहमिलन भोजनाचे आयोजन. हे सर्व कार्यक्रम कल्याण (पूर्व) येथील चंद्रभागा हॉल, अनमोल गार्डनसमोर, पिसवली येथे पार पडणार आहेत.
प्रमुख उपस्थिती:
श्री मोरेश्वर भोंईर (मार्गदर्शक, स्थानिक नगरसेवक)
श्री. पुरुषोत्तम ढगले महाराज (शिवसेना उपशहरप्रमुख, अंबरनाथ)
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
सायं. ५ वाजता – होम मिनिस्टर (महिलांसाठी स्पर्धा)
सायं. ६ ते ७ वाजता – विद्यार्थ्यांचा गौरव
सायं. ७ ते १० वाजता – स्नेहमिलन (भोजन व आपुलकीची गप्पा)
भारतीय मजदूर संघ, ठाणे जिल्हा — 70 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळा
संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनात असे नमूद करण्यात आले आहे की, सर्व समाजबांधवांनी आपली उपस्थिती नोंदवून या कार्यक्रमास प्रतिष्ठा व उत्साह द्यावा.
