राजकीय

कल्याण पश्चिममध्ये महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचार रॅलीना उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईर यांनी काल सकाळी काढलेल्या प्रचार रॅलीना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

आगरी सेनेचा कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर याना पाठींबा

सकाळी कल्याण पश्चिमेतील आधारवाडी तलाव येथून सुरू झालेली प्रचार रॅली आधारवाडी हनुमान मंदिर, आधारवाडी चौक, संदीप गायकर निवासस्थान, अन्नपूर्णा नगर, वाडेघर सर्कल, संजीवनी पाटील, हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर वाडेघर पाडा, सापर्डे रिक्षा स्टँड, हिऱ्याचा पाडा, नेटकऱ्या चौक, अशोक नगर, तळ्याचा पाडा, पैलवान चौक, चाणक्य नगरमार्गे आत्माराम भोईर चौक येथे समाप्त झाली.

तर संध्याकाळी निघालेली प्रचार रॅली ही मातोश्री बंगला येथून प्रारंभ होऊन मंगेशी सिटी, दुर्गामाता चौक, घुमटाचा पाडा, लोखंडे पाडा, दुर्गामाता मंदिर, ऋतू कॉम्प्लेक्स, महावीर रिव्हर, रॉइस पॅराडेज, अग्रवाल कॉलेज, प्रभूनाथ भोईर यांचे कार्यालय, चंद्रश गॅलेक्सी, भगीरथ नगर, कै.विशाल भोईर चौक, डॉन बॉस्को शाळा, पुण्योदय पार्क, रौनक सिटी, साई सत्यम, त्रिवेणी, सेंट लॉरेन्स शाळा, मंगेशी सिटीमार्गे मातोश्री बंगला येथे समाप्त झाली.

राज्यात 5 लाख कोटी रुपयांचे उद्योग आणले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या प्रचार रॅलीमध्ये जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, मा.आमदार नरेंद्र पवार, भाजपा शहर अध्यक्ष वरून पाटील, विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, मा. नगरसेवक संदीप गायकर, जयवंत भोईर, मा.नगरसेविका वैशाली भोईर, पुष्पा भोईर, संजीवनी पाटील, स्वप्नील काटे, दीपक भंडारी, रोहिदास गायकर, सिकंदर मढवी, संजय कारभारी, राजीव भोईर, यांच्यासह शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.