ठळक बातम्या

अंगावर कार घालून नेले फरफटत, खुनाचा प्रयत्नचा गुन्हा, आरोपी मात्र फरार

ही माझी खासगी जागा आहे, माझ्या जागेवर तु का थांबला ? या कारणावरून जागा मालकाने तिथे उभे असलेला तरुणाशी वाद घातला. इतकेच नाही तर संतापलेल्या जागा मालकाने त्याची कार या तरुणाच्या अंगावर घालत त्याला काही अंतरापर्यत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली पूर्वेकडील दावडी परिसरात घडला.

याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात खुनचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण-शिळ महामार्गावरील डोंबिवली जवळच्या दावडी परिसरातील तुकाराम नगरमध्ये संजय हरिश्चंद्र यादव (27) हा तरुण राहतो. संजय हा एमआर अर्थात औषध विक्रीचा नौकरी करतो.

शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सर्दीची गोळी आणण्यासाठी संजय जात होता. रस्त्यात मित्र भेटला. दावडी येथील शिवमंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला एका जागेवर उभे राहून संजय त्याच्या मित्राशी बाेलत होता.

Dawdi Car Accident| भयंकर दुस्साहस| आरोपी फरार| शिकायत वापसी का दबाव

इतक्यात मिलिंद नाथा ठाकरे (35) हा त्याच्याजवळ आला. ज्या जागेवर तुम्ही उभे आहात, ती जागा माझी खासगी मालकीची आहे. त्या जागेवर उभे राहून का बोलत आहात ? या कारणावरुन मिलिंद आणि संजय यांच्यात वाद झाला.

त्यानंतर संजय घराकडे जाण्यासाठी निघाला. दरम्यान संजय हा रस्त्याने जात असताना मिलिंद ठाकरे याने कार घेऊन आले. त्यांनी संजयला मागून धडक देत त्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेले.

संजयच्या मित्रासह रस्त्यावरील पादचारी ओरडत होते. तरीही त्याकडे कार चालकाचे दुर्लक्ष करून तेथून पळ काढला. पुन्हा तो कारचालक माघारी फिरला आणि पुन्हा कार त्याच्या अंगावर घालण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र विद्युत खांबामुळे संजय बचावला.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या दुर्घटनेत संजय यादव याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात मिलिंद ठाकरे याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाला तीन दिवस उलटले तरी आरोपी अद्याप फरार असून पोलिस उपनिरीक्षक एस. पी. काळदाते त्याचा शोध घेत आहे.