हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढणार
मुंबई दि.२३ – मध्य रेल्वेने हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला असून हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वेगमर्यादा ताशी ८० किमीवरून ताशी १०० किमी करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल लोकल प्रवासासाठी एक तास २० मिनिटे, तर, ठाणे ते वाशी लोकल प्रवासासाठी ३० मिनिटे लागतात. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वेगमर्यादा ताशी ८० किमीवरून १०० केल्यानंतर प्रवाशांच्या प्रवासातील दहा मिनिटे वाचणार आहेत.