विधानसभा अध्यक्ष पक्षपात करत आहेत – सुनील प्रभू
मुंबई दि.२३ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पक्षपात आणि वेळकाढूपणा करत आहेत अशी तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केली आहे.
साक्ष, पुरावे, प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेली असतानाही विधानसभा अध्यक्ष नार्वेकर शिंदे गटाला वाढीव वेळ देत कारवाई लांबवत आहेत असे प्रभू यांचे म्हणणे आहे. दरम्यान आज ठाकरे प्रभू यांच्या उलट तपासणीला सुरुवात झाली आहे.