भायखळा येथील म्हाडा संकुलातील बहुमजली इमारतीला आग; रहिवाशांची सुखरूप सुटका
मुंबई दि.२३ – भायखळा पूर्व येथील घोडपदेव विभागातील म्हाडा संकुलातील न्यु हिंद मिल कपाऊंडच्या ३ सी या २४ मजली इमारतीला आज पहाटे आग लागली. इमारतीतील १३५ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
विधानसभा अध्यक्ष पक्षपात करत आहेत – सुनील प्रभू
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एक ते चोवीस मजल्यांवरील इलेक्ट्रिक मीटर केबिन, वायरिंग, केबल आणि इलेक्ट्रिक डक्टमधील साहित्यात आग लागली.