प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) तपासणी मोहिमेत ८२ वाहनचालकांकडून ८३ हजार रुपयांचा दंड वसूल
ठाणे दि.१७ :- ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) तपासणी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत २३ पीयूसी केंद्रांसह ५६८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून ८२ वाहनचालकांकडून ८३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दिवाळी सुट्टीत एसटीला ३२८ कोटी ४० रुपयांचा महसूल
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका आणि पोलिसांकडून दिवाळी नियमांचे उल्लंघन करून फटाके फोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता वाहनातील उत्सर्जित धुरावाटे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग सज्ज झाला आहे.