वाहतूक दळणवळण

बेलापूर ते पेंधर मार्गावर उद्यापासून नवी मुंबई मेट्रो सुरू

मुंबई दि.१७ :- बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रो अखेर उद्यापासून (शुक्रवार) नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. बेलापूर ते पेंधर असा पहिला टप्पा शुक्रवारपासून सुरु होणार असून बेलापूर ते पेंधरचा हा मार्ग ११ किलोमीटर आहे.

प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) तपासणी मोहिमेत ८२ वाहनचालकांकडून ८३ हजार रुपयांचा दंड वसूल

पेंधर ते बेलापूर या स्थानकांदरम्यान सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो धावणार आहे तर दोन्ही बाजूंची पहिली मेट्रो फेरी रात्री १० वाजता असणार आहे.
मेट्रोचे तिकिट दर ० ते २ किलोमीटर टप्प्यासाठी १० रुपये

दिवाळी सुट्टीत एसटीला ३२८ कोटी ४० रुपयांचा महसूल

२ ते ४ किलोमीटर टप्प्यासाठी १५ रुपये, ४ ते ६ किलोमीटर टप्प्यासाठी २० रुपये, ६ ते ८ किलोमीटरसाठी २५ रुपये, ८ ते १० किलोमीटरसाठी ३० रुपये आणि त्यापुढील टप्प्यासाठी ४० रुपये असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश काढून ही माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *