वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविणार आणि वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करणार – राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय
मुंबई दि.१६ :- प्रत्येक राज्यामध्ये १० लाख लोकसंख्येमागे १०० एमबीबीएस डॉक्टर हे गुणोत्तर राखण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याचा, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्षे २०२५-२६ पासून करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून सांगण्यात आले.
मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्ग; माथेरानच्या डोंगराखालून जाणाऱ्या दुहेरी बोगद्याचे बांधकाम सुरू
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने १ नोव्हेंबर २०२३ रोजी दिलेल्या आदेशानुसार, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाअंतर्गत असलेल्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने या गुणोत्तराची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘उबाठा’ गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना झालेली अटक म्हणजे राजकीय दबावतंत्र – संजय राऊत
त्यानुसार देशातील सर्व राज्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करणे, नवीन वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणे, सध्या असलेल्या अभ्यासक्रमांच्या जागा वाढविणे त्याचबरोबर मूल्यांकन आणि गुणात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.