* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ‘उबाठा’ गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना झालेली अटक म्हणजे राजकीय दबावतंत्र – संजय राऊत – मुंबई आसपास मराठी
राजकीय

‘उबाठा’ गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना झालेली अटक म्हणजे राजकीय दबावतंत्र – संजय राऊत

मुंबई दि.१६ :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना काल झालेली अटक पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग आहे, असा आरोप उबाठा गटाचे खासदार व नेते संजय राऊत यांनी केला आहे. हे आरोप या आधीही त्यांच्यावर करण्यात आले होते. मात्र तेव्हा ते भाजपमध्ये होते. मात्र ते आता उबाठा गटात आले म्हणून मंत्री दादा भुसे यांनी षडयंत्र केले आहे, असे राऊत म्हणाले.

दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू – राज ठाकरे

गिरणा सहकारी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची १७८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप दादा भुसे यांच्यावर आहे. राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी कारखान्याच्या माध्यमातून ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला, असा आरोप खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.

दिवाळीनिमित्त राजभवनातील कर्मचारी, कामगारांना मिठाई वाटप

हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप भाजपचेच लोक करतात. या अशा लोकांवर कारवाई होत नाही. मात्र काल अद्वय हिरे यांना अटक करून आम्ही सुडाचे राजकारण करू, असे सरकारने दाखवून दिले आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *