ठळक बातम्या

फटाके वाजविण्याच्या वेळमर्यादेचे उल्लंघन; मुंबई महानगर प्रदेशात पाच दिवसांत दीड हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.१६ :- हवा प्रदूषण नियंत्रणासाठी फटाके वाजविण्यावर उच्च न्यायालयाने घातलेल्या वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबई महानगर प्रदेशात पाच दिवसांत सुमारे दीड हजार बेशिस्त फटाकेबाजांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगर प्रदेशात हवेचा दर्जा घसरला असून, दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीने प्रदूषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने फटाक्यांसाठी रात्री आठ ते दहा, अशी वेळमर्यादा निश्चित केली होती.

मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्ग; माथेरानच्या डोंगराखालून जाणाऱ्या दुहेरी बोगद्याचे बांधकाम सुरू

मात्र, दिवाळीच्या दिवसांत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे चित्र सर्वत्र दिसले. रात्री आठच्या आधी आणि दहाच्या नंतरही अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. मुंबई पोलिसांनी १०, ११ आणि १२ नोव्हेंबर या तीन दिवसांत ७८४ गुन्हे दाखल केले. याप्रकरणी ८०६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यातील ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांत आणखी सुमारे साडेतीनशे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात फटाके विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

‘उबाठा’ गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना झालेली अटक म्हणजे राजकीय दबावतंत्र – संजय राऊत

ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्येही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी ३०० हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *